अमळनेर:- सायंकाळी घरात घुसून एका महिलेने मालकिणीच्या डोळ्यात मिरची फेकून तिच्या हातातील चार तोळ्यांच्या बांगड्या सह दागिने लांबवले आहेत.
सुधा शांतीलाल जैन (रा. न्यू प्लॉट) ही २० रोजी सायंकाळी आपल्या घरात मुलासह आतून दाराला कडी लावून बसलेली असताना तोंडावर फडके बांधून एक महिला कडीला हात घालून आत आली. तिने सुधा जैन हिला खाली पडून तिच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तिच्या हातातल्या चार तोळ्यांच्या बांगड्या ओढून घेतल्या तसेच कानातले ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात सुधा यांच्या कानाला इजा झाली. त्यानंतर चोरटी महिला घरातून पळून गेली. अमळनेर पोलिसांत याबाबत तक्रार करण्यात आली आहे.