
अमळनेर:- कोळी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे १० ऑक्टोबर पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु असून त्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ह्या रस्ता रोको मुळे महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजा पर्यंत तर धुळे रोड, कचेरी रोड पर्यंत वाहनांच्या रांगा दिसत होत्या. आंदोलनात महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती. टोकरे कोळी समाजाचे जिल्हा अधिकारी जळगाव येथे १० ऑक्टोबर पासून आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी या जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. तरीसुद्धा शासन संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे मुद्दामहून मागणीकडे दुर्लक्ष करीत असून त्याचे संवैधानिक अधिकार मिळण्यापासून पासून वंचित ठेवत असल्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे. त्यावेळी कोळी समाजाची समजूत काढण्यासाठी शासनातर्फे एसडीपीओ सुनील नंदवाळकर हे आलेले होते. त्यावेळी एसडीपीओ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी कोळी समाजाचे भूषण कोळी, मनोज कोळी, जितेंद्र कोळी, गोपाल देवराज, राहुल येवडे ,सतीश कोळी,समाधान कोळी, महेंद्र कोळी, सुनील कोळी, हर्षल कोळी, बापू कोळी, ताराचंद कोळी, ओम कोळी, हिरालाल कोळी, सुखदेव कोळी, महेंद्र कोळी, अक्षय कोळी, सुभाष कोळी, ज्ञानेश्वर कोळी, नामदेव कोळी,भूषण कोळी, राहुल कोळी, अजय कोळी, प्रवीण कोळी, विजय कोळी, किरण गंगाराम कोळी, भरत मोरे,उत्तम कोळी, खुशाल कोळी, रघुनाथ कोळी, मधुकर सोनवणे,संदीप कोळी, गोकुळ तायडे भगवान तायडे प्रकाश कोळी, प्रभाकर कोळी, दशरथ कोळी, चंद्रकांत कोळी, मणिलाल कोळी, किशोर कोळी, पुंडलिक कोळी, वसंत कोळी, आकाश कोळी, राकेश कोळी, सुरेश कोळी उपस्थित होते. रास्ता रोको वेळी एपीआय हरिदास बोचरे,पीएसआय विकास शिरोडे, पोलिस कर्मचारी दिपक माळी, रवि पाटील, संजय पाटील, श्रीराम पाटील यांनी वाहतुक सुरळीत केली.




