अमळनेर:- शहरातील प्रभाग क्रं १४ मधे विद्या विहार कॉलनीत विकासकामांचे मंत्री अनिल पाटील हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील विद्येश्वर महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक २२ मार्च पाडव्याच्या मुहूर्तावर मंत्री अनिल पाटील यांनी महादेव मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मंदिराच्या ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तसेच पेवर ब्लॉक बसवून देईन, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार अवघ्या दहा दिवसांतच ह्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी मा.नगरसेविका कमलबाई पाटील तसेच रवि पाटील यांनी पाठपुरावा केला असून भूमिपूजन प्रसंगी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून सुरभी कॉलनी, शाहू नगर, गुरुकुपा कॉलनी, भालेराव नगर, आर.के.नगर इ.भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत.