
अमळनेर:- जि प उच्च प्राथ डिजिटल शाळा पळासदळे येथील पदवीधर शिक्षक दिलीप प्रतापराव सोनवणे यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी केदारेश्वर चव्हाण, राजेंद्र सोनवणे, श्रीनिवास सोनवणे, अशोक ठाकुर, प्रदीप चव्हाण व कैलासदादा आदी मान्यवर उपस्थित होते. “एक विनोदी स्वभावाचे व शिक्षकांकडून काम करुन घेण्यात जे कौशल्य असते ती सोनवणे सरांची जमेची बाजू आहे, सर्व जबाबदारी ते लीलया पार पाडतील प्रशासकीय ते सामाजिक काम करण्याचे कौशल्य असल्यामुळे ढेकू खु केंद्राचे आदर्श नाव नक्कीच जिल्हात पोहचवतील असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. केंद्रामधून व तालुक्यामधून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे.