अमळनेरात ही अभिलेखातून नोंदींचा शोध घेणे सुरू…
अमळनेर:- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी शोधण्याबाबत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्याने अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखातून कुणबी नोंदीचा शोध घेणे सुरू झाले आहे.
संपूर्ण राज्यभरात कुणबी नोंदींचा शोध घेतला जात असून अमळनेर प्रशासनास ही सूचना प्राप्त झाल्याने सदर नोंदी शोधण्यासाठी तलाठी आणि कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नोंदी ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान शोधून विवरण पत्रात भरून शासनाकडे सादर करायचे आहेत. दरम्यान अमळनेर तहसील कार्यालयातील अभिलेखात सर्वच ठिकाणी कुणबी नोंदी आढळत असल्याचे प्रशांत एस धमके यांनी सांगितले. कुणबी नोंदी शोधण्यासाठी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी संदीप शिंदे, अमोल सोनवणे, प्रकाश महाजन, भुपेश पाटील, बळीराम काळे,प्रदीप भदाणे यांच्यासह कोतवाल राजेंद्र मोरे, घनश्याम पाटील, उमेश पाटील, श्रीमती वैशाली पाटील,गायत्री साळवे, सागर पाटील मदत करीत आहेत.