शहापूर ग्रामस्थांनी २००५ पासून बिनविरोध सरपंच निवडीची परंपरा ठेवली कायम…
अमळनेर:- तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीची निवडणूक २००५ पासून बिनविरोध करण्याची परंपरा ग्रामस्थांनी कायम ठेवली असून यासाठी तरुण वर्गांचे मोठे सहकार्य लाभल्याने ही परंपरा टिकून आहे.
ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे पूर्ण झाल्याने योगिनी बाळासाहेब पाटील यांनी कार्यकाळ संपल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला. व एकमेव अर्ज आल्यामुळे शहापूर येथील पोलीस पाटील यांची आई सुमनबाई दौलत पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस आर बोरसे यांनी जाहीर केले. सुमनबाई ह्या शहापूर येथील पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांच्या मातोश्री असून सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडून विकास कामाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आई गाव विकासासाठी व मुलगा गावात शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तलाठी भावसार, ग्रामसेवक समाधान निकम यांनी काम पाहिले. यावेळी प्रदीप पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, अरुण पाटील, भानुदास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निलेश पाटील, दिलीप पाटील, आधार पाटील आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया…
माझ्या गावकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दर्शविला, या विश्वासाला तडा न जावू देता गावात विकास कामांची घोडदौड चालू ठेवू. तसेच गाव स्वच्छ व सुंदर व शांतता प्रिय ठेवण्यासाठी प्रयत्न करेन.
– नूतन सरपंच श्रीमती सुमन दौलत पाटील, शहापूर ता. अमळनेर
Related Stories
December 22, 2024