पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी…
अमळनेर:- येथे संपन्न होणाऱ्या अ.भा.मराठी व विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शतकापासून वाङमय व साहित्यिक सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार राहिलेले पू. सानेगुरुजी यांचा अर्बन बँकेसमोरील पुतळा सुशोभित करणे सुरू झाले आहे. मात्र सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, टाऊन हॉल यांचे परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते नगरपरिषदेने करून द्यावे, अशी मागणी न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे संबंधित संस्थाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
अमळनेर ही सानेगुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलन तसेच १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील, व राज्यातील नामवंत साहित्यिक,वाचक, श्रोते भेट देतील म्हणून नगरपालिकेने अर्बन बँकेसमोरील सानेगुरुजी पुतळा अद्ययावत व सुशोभित करणे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे दीड शतकापासून वांडमयीन व साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार राहिलेले पू. सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले लोकमान्य स्मारक समिती सभागृह यांचे खान्देशच्या साहित्यिक व वांडमयिन इतिहासात महत्वाचे स्थान आहे. सदर परिसरात पू. सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र चालविले जाते जिथे राज्यभरातील आयएएस व आयपीएस अधिकारी येत असतात. म्हणून अमळनेर नगरपरिषदेने पू.सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, टाऊन हॉल येथील परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते सुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी चर्चा करून दिलेल्या निवेदनातून यावेळी लोकमान्य स्मारक समितीचे चिटणीस प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, पू. सानेगुुरूजीं ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी केली. याप्रसंगी न.प.चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, न.प.शिक्षण मंडळाचे लिपिक सुनिल पाटील आदी उपस्थित होते.