माजी जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम…
अमळनेर:-तालुक्यातील खेडी, खर्दे, वासरे येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन लोकार्पण माजी जि. प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
खेडी, खर्दे येथील सोहळ्यात कामगार नेते एल.टी. पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, संचालक समाधान धनगर, विजय शेखनाथ पाटील, उज्वला पाटील, प्रविण पाटील, दिनेश पाटील सरपंच वासरे, सर्जेराव पाटील खर्दे, कैलास पाटील शहापूर, योगेश पाटील वासरे, विश्वास पाटील, नारायण पाटील, चिंतामण पाटील, विजय पाटील, कृष्णादास पाटील, उमेश पाटील, प्रकाश पाटील, गोलू परदेशी, यादव पाटील, राजू पाटील, अनिल पाटील, शरद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, प्रकाश परदेशी, गोरख पाटील, हिरालाल पाटील, पद्म नाना यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर वासरे येथे सरपंच दिनेश पाटील, कैलास पाटील शहापूर,सर्जेराव पाटील खर्दे, दीपक पाटील, सुनिल पाटील, योगेश पाटील, सुरेश पाटील, दीपक पाटील, छोटू पाटील, हिरालाल पाटील, मनोहर पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र पाटील यांच्या सह ग्रामस्थ कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वासरे येथे पाणीपुरवठा योजना व गाव दरवाजा लोकार्पण…
वासरे येथे 90 लक्ष निधीतून नवीन पाणीपुरवठा योजना, 6 लक्ष निधीतून गाव दरवाजा, 2515 अंतर्गत 15 लक्ष निधीतून सभामंडप या कामांचे लोकार्पण तर २५१५ अंतर्गत सभागृह बांधणे, रक्कम १५ लाख या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
खर्दे येथे पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण…
खर्डे येथे जलजीवन मिशन अंतर्गत 25 लक्ष निधीतून पूर्णत्वास आलेली नवीन पाणीपुरवठा योजना तसेच 2515 अंतर्गत 7 लक्ष निधीतून झालेल्या स्मशान भूमीचे लोकार्पण करण्यात आले तर आमदार निधी सभामंडप १५ लक्ष, २५१५ अंतर्गत गाव दरवाजा या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
खेडी येथेही विविध लोकार्पण व भूमिपूजन…
खेडी येथे २५१५ अंतर्गत सभामंडप बांधणे भूमिपूजन १५ लाख तर २५१५ अंतर्गत सभामंडप १५ लक्ष,आणि नवीन पाणीपुरवठा योजना २३ लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले.