
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथील माहेर असलेल्या विवाहितेला हुंड्यासाठी मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी गायत्री विनायक पाटील रा. भुसावळ हमु बोहरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ एप्रिल २०१९ या तारखेला लग्न झाल्यापासून सहा महिन्यानंतर भुसावळ येथील सासरच्या मंडळींनी लग्नात ऐपतीप्रमाणे हुंडा दिला नाही, तसेच पाहुणे मंडळींना मानपान दिला नाही या कारणावरून विवाहितेला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शेती विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणीस विवाहितेने नकार दिल्याने विवाहितेला माहेरी आणून तिच्या आईशी वाद घालत विवाहितेला मारहाण केली. या कारणावरून विवाहितेचा पती विनायक अशोक पाटील, सासरे अशोक दशरथ पाटील, सासू शोभाबाई अशोक पाटील, जेठ दिलीप अशोक पाटील, जेठाणी मनीषा दिलीप पाटील, चुलत जेठ विजय पाटील, व वर्षा विजय पाटील यांच्या विरोधात मारवड पोलिसात भादवि कलम ४९८, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. कॉ. मुकेश साळुंखे करीत आहेत.



