
अमळनेर:- तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करत मनसेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अमळनेर तालुक्यात जानेवारी महिन्यात जोरदार वादळी वाऱ्यामुळे व बेमोसमी पावसामुळे मका, गहू, दादर, हरभरा, या पिकांचे नुकसान झाले असून त्याचा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. शेतकरी आधीच हवालदिल असून त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावर पंखल पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी डॉ. अरुण गव्हाणे, संदीप पाटील यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.






