अमळनेर:-चंद्राई बिग बिलिनियर मल्टीपर्पज फाउंडेशन, धुळे यांच्याकडून दिला जाणारा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला.
एस.एन.डी.टी महिला महाविद्यालय, अमळनेर येथे संपन्न झालेल्या एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये प्रा.डॉ. एस. जे. शेख, प्राचार्य एस.एन.डी.टी महिला महाविद्यालय, तसेच प्रा. डॉ. दीपक विश्वासराव पाटील, अकॅडमीक परफॉर्मन्स इंडिकेटर एक्सपर्ट, तसेच प्रा. एस पी ढाके यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये द रोल ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी- 2020 इन इंडियन एज्युकेशन सिस्टीम याबद्दल शोधनिबंधाचे सादरीकरण व शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. प्रमोद पाटील, सेक्रेटरी, रायबा बहुउद्देशीय संस्था, धुळे, प्रा.डॉ. मंजुषा खरोले, प्रा. डॉ. उमेश गांगुर्डे, को-कॉर्डिनेटर, प्रा. प्रिया पाटील उपस्थित होते. याबद्दल अनिल पाटील यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. शाम पवार, प्राचार्य पी एम कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, तसेच विविध स्तरातील मान्यवर व सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.