
सुंदरपट्टी येथे केले शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण…
अमळनेर:- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्ताने लोकोपयोगी उपक्रम आयोजित करत सुंदरपट्टी येथे शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
सुंदरपट्टी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास सुंदरपट्टी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दिपक सोनवणे तसेच जेष्ठ नागरिक परसराम पाटील, भालचंद्र पाटील, अमोल पाटील, वना पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले तसेच श्रीमती जयश्री बारड यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीमती स्मिता सोनवणे यांनी केले.




