अमळनेर:- तालुक्यातील मेहेरगाव येथील अपंग शेतकऱ्यास वहिवाटी प्रकरणी न्याय मिळत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाची मागणी केली आहे.
मेहेरगाव येथील अपंग शेतकरी सचिन देवीदास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपोषणासाठी परवानगी मिळावी म्हणून पत्र दिले असून त्यात आपली व्यथा मांडली आहे. कायदेशीर वहिवाट मिळावी म्हणून तहसीलदारांकडे मे २०२१ पासून अर्ज केला असून अद्याप कोणतीही सुनावणी झाली नसून प्रत्येक वेळी पुढची तारीख देवून चालढकल केली जात आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असून रस्ता नसल्याने उत्पन्नास बाधा येत आहे. आतापर्यंत २९ डिसेंबर २१, २७ जानेवारी २२ व २ फेब्रुवारी २२ रोजी तारखेस पुरावे सादर केले मात्र दरवेळी पुढची तारीख देवून तहसीलदार चालढकल करत असल्याचा आरोप सदर पत्रात केला आहे. तसेच सदर शेतकरी व कुटुंबाचे काही बरे वाईट झाल्यास प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे असे नमूद केले आहे. व १० फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी परवानगी मागण्यात आली आहे.