कार्यकारी अभियंता यांना दीपक पाटील यांचे निवेदन…
अमळनेर:- शहरातील बऱ्याच भागात वीजभार हा अतिरिक्त असूनही मागील भार प्रमाणे रोहित्र बसविन्यात आले असून त्यावर ग्राहकांची संख्या व वीजभार वाढल्याने शहरातील नगरपालिका हद्दीतिल अतिरिक्त भाराचा विचार करुण तात्काळ रोहित्रभार वाढविन्यात यावा अशा आशयाचे निवेदन नगरसेविका गायत्री पाटील, संजय निराधार योजनेचे सदस्य दीपक पाटील यांनी अमळनेर येथील महावितरण कंपनीचे अभियंता व्ही एस देशमुख यांना दिले.
यावेळी दीपक पाटील यांनी देशमुख यांना शहरातील आशीर्वाद नगर, हरिओम नगर, तुकाराम वाडी, कृषि विकास नगर, केले नगर,महात्मा फुले नगर, वामन नगर ढेकु रोड लगत आदी भागात अतिरिक्त भार वाढला असून मागील वीज भार प्रमाणेच रोहित्र बसविन्यात आले आहे. मात्र याठिकाणी यानंतर वीज ग्राहक व वीजभार वाढल्याने तात्काळ जास्तीचा वीजभार असलेले रोहित्र बसविन्यात यावे यासाठी दीपक पाटील यांनी अभियंता देशमुख यांना या भागात त्याठिकानी जावून पाहणी केली. ढेकु रोड ते पोलीस वसाहतीपर्यंतचा भार पडत असल्याने सकाळी याभागात नळाला पाणी आल्यास विद्युत मोटरी बंद पडतात व वीजपुरवठा बंद होतो.यासाठी जास्तीचा भार असलेला रोहित्र तात्काळ बसविन्यात यावा असे यावेळी नगरसेविका गायत्री पाटील संजय निराधार योजनेचे सदस्य दीपक पाटील यांनी केली असून महावितरण कंपनीचे अभियंता यांनी तात्काळ वाढीव भागात लक्ष घालुन रोहित्र बसविन्यात यावे अशीही त्यांनी मागणी केली आहे.