अमळनेर:- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे अमळनेर येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले मयुर बाळकृष्ण बागुल यांचे सर्जक पुस्तकं दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे शहरातील चपराक प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित करण्यात येणार आहे.
मयुर बागुल हे अमळनेर येथ साप्ताहिक उदयकाळ वृत्त संपादक बाळकृष्ण बागुल यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. ते पुणे शहरात सध्या वास्तव करत असून समाजातील विविध सामाजिक विषयावर लेखन करत असतात. दैनिक ऍग्रोवन अंकात आजवर अनेक लेख प्रकाशित झाले आहे. आज वर लेखन केलेले अप्रकाशित व प्रकाशित लेखाचे एकत्रीकरण करून सर्जक हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा जेष्ठ साहित्यीक अमर हबीब, बाळकृष्ण हरिभाऊ बागुल, प्रभावती बाळकृष्ण बागुल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लेखक जे. डी. पराडकर, शिक्षणतज्ञ संदीप वाकचौरे, साहित्यिक घनश्याम पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. प्रताप महाविद्यालयातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.