
अमळनेर:- श्री विश्वकर्मा मयकला पांचाळ सुतार सहाय्यक मंडळ,पैलाड यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सुतार समाज मंदिर पैलाड,अमळनेर येथे करण्यात आले आहे.

प पु ह भ प प्रसाद महाराज, श्री श्री महामंडलेश्वर महंत व श्री ईश्वरदासजी महाराज यांच्या आशिर्वादाने हा कार्यक्रम होणार असून यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना अनिल भाईदास पाटील,खा उन्मेष पाटील, माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार स्मिता वाघ,मुंदडा बिल्डर्स चे ओमप्रकाश मुंदडा,सरजू गोकलानी, डिगंबर महाले यासह असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात सकाळी 8 वाजता विश्वकर्मा महापूजन, 9 वाजता भजन,10 वाजता स्वागत समारंभ, दुपारी 1 नंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी सर्व सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, तांबट यासह विविध संघटनांचे व ग्रुपचे सहकार्य लाभणार आहे.तरी सर्व हितचिंतकानी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


