अमळनेर:- येथील अंशतः अनुदानित संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील तमाम अंशतः अनुदानित बांधव 13 जानेवारी 2024 पासून आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. हक्काचा १००% पगार मिळावा व 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा मिळावा अशी मागणी करत निवेदन देण्यात आले. प्रसंगी मुंदडा हायस्कूल येथील पी एस विंचूरकर, गोकुळ पाटील,प्रदीप चौधरी, बी.बी. पाटील,डी.बी.पाटील,रुपाली भामरे,संगीता बाविस्कर,मनीषा पवार, स्वाती बोरसे, राहुल महाजन,राहुल पाटील,प्रकाश पाटील,दिपक पाटील आदी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.