अमळनेर:- येथील साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे,पुणे सिनेट सदस्य राजेश पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.विद्यार्थ्यांना सहज भाषेत इंग्रजी भाषा समजावी यासाठी भैय्यासाहेब मगर यांनी इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिका तयार केली आहे. इयत्ता 5वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण ग्रामर फॉर्म्युले सोप्या पद्धतीने मांडले आहेत. या फॉर्म्युलाचा वापर करून इंग्रजी भाषा वाचणे व लिहिण्यास मदत होते. सदर ग्रामर पुस्तिका रंगीत व आकर्षक स्वरूपात आहे. दीर्घकाळ टिकण्यासाठी प्लास्टिक कोटेडचा वापर केला आहे.शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच आकर्षित करणारी ही पुस्तिका असणार आहे.या पुस्तिकेचा वापर करून कोणताही विद्यार्थी सहज इंग्रजी लिहू व वाचू शकतो, असा विश्वास भैय्यासाहेब मगर यांनी व्यक्त केला आहे.