
अमळनेर एसटी आगार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल…
अमळनेर:- ड्युटी संपल्यावर घरी ये महत्वाचे बोलायचे आहे, असे फोनवर सांगून घरी बोलवून उजवा हात पकडून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करून महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या आगार व्यवस्थापकावर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला ही अमळनेर आगारात वाहक म्हणून नोकरीस आहे. दि.३ फेब्रुवारी रोजी अमळनेर- पारोळा बसवर ड्युटीला असताना आगार प्रमुख इम्रान पठाण यांनी पिडीत वाहक महिलेच्या मोबाइलवर फोन करून मंदिरात येशील तेव्हा मला घरी येवून भेट असे सांगू लागला. काय काम आहे ? असे विचारल्यावर महत्वाचे बोलायचे आहे. घरी ये सांगतो असे सांगितले. दुपारी साडेबारा वाजता ड्युटी संपल्याने पिडीत व एक महिला वाहक असे दोन्ही जन मंदिरात दर्शनासाठी गेले मात्र सोबत वाहक महिलेची ड्युटी असल्याने ती लगेच गेली.आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांना मंदिराजवळ असल्याचे सांगितल्यावर त्यांनी घरी ये असे सांगितले.घरी गेल्यावर त्यांना आवाज दिला ते घराबाहेर आल्यावर त्यांना त्यांची पत्नी घरी आहे का ? याबाबत विचारणा केली.मात्र ती गावाला गेली असल्याचे त्यांनी सांगितले.मी त्या राहिल्या कि तेव्हा येईल असे सांगितले. परंतु तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.दोन मिनिट घरात ये, असे सांगितले. काहीतरी महत्वाचे असेल म्हणून महिला वाहक घराच्या उंबरठ्यावर उभी राहिली.मात्र त्यांनी उजवा हात पकडून मला घरात ओढले व वाहकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असताना महिला हाताला झटके देत बाहेर पळाली.व उपस्थित असलेल्या महिला वाहकाला सर्व हकीकत सांगितली. व घरी जावून आईला सर्व हकीकत सांगितली.मात्र आगारात नोकरीला असल्याने गुन्हा दाखल केला कि त्रास देतील म्हणून महिला वाहक घाबरत होती. मात्र इतर महिलासोबत हा प्रकार घडू नये म्हणून तिने पोलीसात धाव घेत तक्रार दिल्याचे फिर्यादी नमूद केले आहे. त्यानुसार आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.


