अमळनेर:- तालुक्यातील सारबेटे येथील ग्राम विकास संस्था संचलित कमलाबाई विनायक पाटील सार्वजनिक विद्यालय येथील श्रीमती अनिता पाटील यांना नुकताच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
श्रीमती अनिता पाटील यांना हा पुरस्कार माजी खासदार सैनिकी फेडरेशनचे अध्यक्ष बिग्रेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते तर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष रोहिणीताई खडसे, धुळे जि.प.अध्यक्ष धरती देवरे, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष व्यंकटराव जाधव, कार्याध्यक्ष गजेंद्र कानडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राजश्री शाहू महाराज नाट्यगृह धुळे या ठिकाणी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. श्रीमती अनिता पाटील या गेल्या 33 वर्षापासून शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत. शैक्षणिक कामकाजामध्ये शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, विविध शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प राबविणे तसेच शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम अमलात आणणे यांसोबतच सामाजिक कार्यात देखील सहभागी होत असतात. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्रीमती अनिता पाटील यांना स्वर्गीय विनायक झुपरू पाटील, वडील भानुदास सोनवणे, सासरे लोटन आधार पाटील तसेच प्रमिला लोटन पाटील, पती अनिल लोटन पाटील या सर्व घरातील जेष्ठ मंडळींकडून शैक्षणिक वारसा लाभला. श्रीमती अनिता पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे ग्राम विकास संस्था मुडी या संस्थेचे अध्यक्ष, शाळेचे सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संभाजीनगर येथील सैनिकी शाळेचे प्राचार्य ऋषिकेश लोटन पाटील, सीमा ऋषिकेश पाटील, अविनाश अनिल पाटील, हेमांगी अविनाश पाटील, अरुंधती कौस्तुभ कळंबे आदींनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.