आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ. हेमचंद्र पांडे यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयात (स्वायत) दि.२४ व २५ फेब्रुवारी दरम्यान “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात ‘ विदेश में व्यापार के क्षेत्र में हिंदी’ या सत्रात डॉ. हेमचंद्र पांडे (जेएनयू, दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सूरज प्रकाश बडतिया, (जापान), डॉ. अनिरबाण घोष, (वर्धा) यांनी आपले शोधनिबंध सादर केले. डॉ. हेमचंद्र पांडे म्हणाले की, “हिंदी भाषेच्या विकासासाठी सर्व हिंदी भाषिकांनी पुढे येण्याची गरज आहे.” असे आवाहन केले
चौथ्या सत्रात ‘विदेश में जनसंचार के क्षेत्र में हिंदी’ या सत्रात आखमादजान कासिमोव (उजबेकिस्थान) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. ब्रसिल नागॉड (श्रीलंका), डॉ. जयंतीप्रसाद नौटियाल (देहराडून) डॉ. सुशील उपाध्याय (देहराडून), डॉ. सुरेश माहेश्वरी (माजी हिंदी विभागप्रमुख, प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांनी निबंधाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल हे उपस्थित होते. सोबत पद्मश्री प्रा. मिजोकामी तोमियो,(माजी प्राध्यापक ओसाका विश्वविद्यालय, जापान) डॉ. संजीता वर्मा, (काठमांडू, नेपाळ), डॉ.नूतन पांडेय (मॉरीशस), डॉ. दीपक पांडेय (दिल्ली) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन, सहचिटणीस तथा अधिसभा सदस्य, डॉ धीरज वैष्णव, परिसंवादाचे संयोजक डॉ.कुबेर कुमावत, आयक्युएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, डॉ. विजय मांटे, अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर आदि उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिता राजबंशी यांनी केले तर आभार डॉ. कल्पना पाटील यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी परिसंवादाचे संयोजन केले.
Related Stories
December 22, 2024