अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे लोकवर्गणीतून शनी मंदिर उभारण्यात आले असून मंदिरातील मूर्ती जीर्णद्वार प्राण प्रतिष्ठा नुकतीच करण्यात आली.
यावेळी महापूजा होम हवन व इतर विधी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, रामकृष्ण पाटील,संदीप पाटील, उमाकांत पाटील, भाऊसाहेब पाटील, भैय्या पाटील या जोडप्यांनी केली. पहिल्या दिवशी दोघी गावांमध्ये प्रदक्षिणा झाली दुसऱ्या दिवशी स्थापित देवता पूजन कलश स्थापन विधी हवन व मूर्तीला जलधिवास, हवन, प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती असे विविध पूजा विधी झाले शेवटी शेवटी महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. कळस पूजन शिरसाळे येथील दीपक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा पूजाविधी यांच्या यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ परिसरातील लोकांनी परिश्रम घेतले.