अमळनेरातील तिघांना अटक करून एक दुचाकी केली जप्त…
अमळनेर:- मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे. या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना अमळनेर शहरातील मनिष उर्फ सनी महाजन हा त्याचे साथिदार याच्या सोबत मारुती सुझकी कंपनीची इको गाडीचे सायलन्सर चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पो.ह. संदीप पाटील, कमलाकर बागुल, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील यांनी मनिष उर्फ सनी महाजन याची माहिती काढून त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव मनिष उर्फ सनी रविंद्र महाजन (रा.शिरुड नाका, श्रीराम कॉलनी अमळनेर) असे सांगीतले. त्यावेळी त्याचे सोबत साथीदार शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील (रा.राजाराम नगर अमळनेर), निखील संतोष चौधरी (रा.राजाराम नगर अमळनेर) अश्यांचे नाव सांगीतल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांनी त्यांचा अजुन एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी( रा. रामेश्वर कॉलनी अमळनेर) हा असून तो सध्या नाशिक जेल मध्ये आहे. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच मनिष उर्फ सनी रविंद्र महाजनकडून चोरीची मोटारसायकल मिळाली आहे. तिन्ही आरोपीना ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासासाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.