अमळनेर:- शहरातील इंदिरा भुवन येथे कुमावत समाज बांधव मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी श्री योगेश कुमावत यांनी प्रास्ताविक भाषण केले .
तद्नंतर समाजातील वरिष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शन केले, आगामी काळात समाजाची राजकीय आणि सामाजिक दिशा, समाजाचे ध्येय तसेच आव्हान या विषयावर विचारविनिमय करण्यात आला. तसेच समाजातील गरजूंना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा झाली, लवकरच समाजाची नविन कार्यकारिणी जाहीर होणार आहे.
यावेळी जवळपास संपूर्ण तालुक्यातील 100 ते 150 समाजबांधव उपस्थित होते. दिपक बेलदार सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे वरिष्ठ रविंद्र उदेवाळ (वरिष्ठ लिपीक अमळनेर नगरपरिषद), प्रा. कुबेर कुमावत, विद्युत ठेकेदार नरेंद्र कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल अशोक कुमावत, कैलास कुमावत, रविंद्र कुमावत सुधाकर कुमावत,समाजसेवक परेश उदेवाळ, राजेश बेलदार, सुरेश कुमावत, मुकुंदा कुमावत, विष्णु कुमावत, दिपक कुमावत, विजय कुमावत, अविनाश कुमावत, दिपक कुमावत, यांनी परिश्रम घेतले.