
साने नगरातील नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन…
अमळनेर:- शहरातील साने नगरात सफाई कामगार नसल्याने नागरिकांनी सफाई कामगार मिळावा म्हणून उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
प्रभागातील दिपक पवार व नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साने नगरातील सफाई कामगाराची गेल्या ७ महिन्यांपासून बदली करण्यात आली असून त्या जागी नवीन कामगार आलेला नाही. लोकप्रतिनिधींकडून ही याची दखल घेतली जात नाही. मुकादम किंवा दुसऱ्या कामगारांना नागरिकांना विनंती करावी लागते. त्यामुळे समस्येचा विचार करून कायमस्वरूपी सफाई कामगार मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदनावर साने नगरातील नागरिकांच्या सह्या आहेत.




