
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधीतून पात्र ग्रामस्थांना भांड्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधीतून मागासवर्गीय व्यक्तींच्या वीस टक्के निधीमधून सार्वजनिक कार्यक्रमासाठीचे भांड्यांचे वाटप सदर ग्रामस्थांना करण्यात आले. यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, मिराबाई बडगुजर, लताबाई भिल, रेश्माबाई चौधरी, गणेश चौधरी, संदीप पाटील, दिनकर चव्हाण, पल्लवी चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व मान्यवर यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.







