
शेतकऱ्याचे तीन लाखाचे झाले नुकसान…
अमळनेर:- तालुक्यातील लोणचारम येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लावून शेतकऱ्याचे तब्बल तीन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
शेतकरी विवेक पतींगराव पाटील यांचे लोण सिम शिवारात शेती असून त्यांनी उसाची लागवड केली आहे. दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता गावातील व्यक्तीने फोन करून सांगितले की, शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली आहे. त्यावेळी त्यांनी गावातील व्यक्तीसोबत मिळून आग विझवण्या साठी प्रयत्न केले मात्र वारा असल्याने आग आटोक्यात आली नाही. सदर आगीत उसाचे पीक व पाईप जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शेतकऱ्याने नमूद केले आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. कॉ. भटू सिंग तोमर हे करीत आहेत.







