आज प्रताप महाविद्यालयात होणार अधिकृत निवड व सत्कार समारंभ…
अमळनेर:- येथील खा.शि. मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. संदेश बिपिन गुजराथी तर कार्योपाध्यक्ष पदी नीरज दिपचंद अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज दि 4 मे रोजी प्रताप महाविद्यालयात सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत अधिकृत निवड व घोषणा होणार आहे.
त्यानंतर तेथेच मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडणार आहे.मावळते कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे व कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आगामी एक वर्षासाठी वरील दोघांना संधी देण्यात आली आहे.यासंदर्भात पॅनल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या पार्टी मिटिंग मध्ये डॉ गुजराथी व अग्रवाल यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. डॉ गुजराथी हे संस्थेचे जेष्ठ व अनुभवी संचालक असून अनेक वर्षापासून ते अखंडितपणे या संस्थेवर निवडून येत आहेत.तीन वर्षांसाठी निवडून आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा 2 वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला असून अखेरच्या एक वर्षांसाठी डॉ गुजराथी व नीरज अग्रवाल यांच्या खांद्यावर संस्थेची धुरा असणार आहे.त्यानंतर पुढील वर्षी संचालक मंडळास त्रैवार्षिक निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे.