
अमळनेर:- येथील नोंदणीकृत असलेल्या तेली पंच मंडळासह तेली समाज बांधवांनी जळगांव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांना एका निवेदनाद्वारे जाहिर पाठींबा दिला आहे.

स्मिता वाघ यांची समक्ष भेट घेऊन तेली पंच मंडळाने जाहिर पाठींब्याबाबत एक पत्र सुपूर्द केले यात त्यांनी तेली समाज युवा प्रतिष्ठान नावाचे कोणतेही प्रतिष्ठान अमळनेर मध्ये अस्तित्वात नसून अमळनेरात फक्त आणि फक्त तेली पंच मंडळ, अमळनेर हेच नोंदणीकृत समाज पंच मंडळ आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.सदर पत्रावर तेली पंच मंडळाचे अध्यक्ष संजय सुदाम चौधरी,सक्रेटरी एकनाथ माधव चौधरी,उपाध्यक्ष सुरेश सखाराम चौधरी,खजिनदार अरुण धोंडू चौधरी,पंच मंडळ सदस्य प्राचार्य डॉ. एस.आर. चौधरी, संजय भिकन चौधरी, आबा नामदेव चौधरी, नरेंद्र विष्णु चौधरी, शांताराम नारायण चौधरी, हिंमत सदाशिव चौधरी, माजी अध्यक्ष श्रीराम भगवान चौधरी, माजी नगराध्यक्ष सुभाष हरचंद चौधरी, कळमसरे येथील रमेश चिंधा चौधरी, जळोद येथील एम.डी.चौधरी, जैतपिर येथील संजय शिवराम चौधरी, मारवड येथील प्रदीप भिका चौधरी, समाज बांधव गणेश रूपचंद चौधरी, अशोक बाबुराव चौधरी, रमेश दगडू चौधरी , नाना दौलत चौधरी, चंद्रकात गणपत चौधरी, शांताराम शामराव चौधरी, आशिष शंकर चौधरी, विशाल गुलाब चौधरी, विजय अशोक चौधरी, शिवाजी विश्वास चौधरी, किशोर दत्तात्रय चौधरी, रविंद्र रघुनाथ चौधरी,चैतन्य मनोज चौधरी, सोनू भटू चौधरी, गणेश प्रकाश चौधरी, सुरेश शामराव चौधरी आदी समाज बांधवांच्या सह्या आहेत.सदर पाठिंब्याबद्दल स्मिता वाघ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

