
अमळनेर:- येथील गुजराथी समाजाच्या सर्व महिला व पुरुष बांधवानी एकत्रित येत जैन जागृती सेंटरच्या माध्यमातून सामूहिक मतदान करत आपला हक्क बजावला.

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने जैन जागृती सेंटरने आपल्या समाजाचे 100 टक्के मतदान करण्याचा संकल्प केला होता.मतदानाला जाताना विशेष ड्रेसकोड देखील ठेवण्यात आला होता. यानुसार जास्तीतजास्त महिला व पुरुष बांधवानी ड्रेसकोड मध्ये न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीत सकाळी 7 वाजताच एकत्रित येऊन तेथून आपापल्या मतदान केंद्रात पोहोचले तेथे प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 वाजेपर्यंत या समाजाचे संपूर्ण 100 टक्के मतदान पूर्ण झाले होते.या उपक्रमाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे अमळनेर येथील सहाय्यक निवडणूक अधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार श्री सुराणा व न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कौतुक केले. सदर उपक्रमासाठी जैन जागृती सेंटरचे अध्यक्ष डॉ संजय शाह व सदस्यांनी परिश्रम घेतले.

