अमळनेर:- ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानव विकास योजनेंतर्गत तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात ४० मुलींना संस्थेचे सचिव श्रीकांत अनिल पाटील यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या.
मुलींना शाळेत येण्या जाण्यासाठी शासनाकडून मोफत सायकली देण्यात आल्या. शाळेत एका छोट्या समारंभात सायकली वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, विश्वास पाटील, अशोक पाटील ,विश्वास पाटील, चुनीलाल पाटील ,नथु पाटील , लक्ष्मण पाटील ,संभाजी पाटील , शिक्षक प्रभूदास पाटील , संजय पाटील , राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , सीमा मोरे , प्रवीण पाटील ,मनोज पाटील , सुदर्शन पवार , प्रदीप पाटील , खुशाल पाटील हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रभूदास पाटील यांनी केले.