रविंद्र पाटील यांना नॉर्वे विद्यापीठाने डॉक्टरेट केली बहाल…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याचे सुपुत्र असलेल्या रविंद्र राजाराम पाटील यांना युरोप मधील आर्कटिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
रविंद्र पाटील यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी नॉर्वे (युरोप) येथील आर्कटिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे येथे अभियांत्रिकी विज्ञान, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणक दृष्टिकोन मध्ये पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) यशस्वीरीत्या पूर्ण केली. या त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कारकिर्दीचे प्रतीक म्हणून त्यांना प्रतिष्ठित डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.डॉ. रविंद्र पाटील यांनी या यशाबद्दल आपल्या आध्यात्मिक गुरु, समर्पित पर्यवेक्षक, कुटुंब, सहकारी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात योगदान दिलेल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. त्यांचे हे यश अभियांत्रिकी विज्ञानाच्या क्षेत्रात, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक दृष्टिकोनात, एक अद्वितीय योगदान ठरत आहे.सध्या नॉर्वे येथेच ते कार्यरत असून अमळनेर नगरपरिषदेचे कर्मचारी राजाराम पाटील यांचे ते सुपूत्र आहेत. त्यांच्या या भव्य आणि गौरवशाली यशाबद्दल डॉ. रविंद्र पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.