
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राचार्य मगन सूर्यवंशी यांनी सन 2022 च्या राज्यस्तरीय ऑनलाईन कविता गायन स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. शिवाजी भोसले एडूवर्ड युट्युब चॅनल आयोजित राज्यस्तरीय कविता गायन स्पर्धेमध्ये गट क्र.5 मध्ये सक्रिय सहभागी होत “सकाळी सकाळी माझ्या खिडकीतून” ह्या पर्यावरणपूरक विषयावर कविता सादर करत 163 स्पर्धकांतून चतुर्थ क्रमांक मिळविला.त्यांना त्याबाबतचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या ह्या यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.







