
अकरा जणांविरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मीराबाई शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचे पती आधार शिरसाठ व गौतम गव्हाणे यांच्या लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर दिनांक २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी व कुटुंबीय घराबाहेर ओट्यावर बसले असताना गौतम गव्हाणे, अनिता गव्हाणे, आकाश गव्हाणे, राहुल गव्हाणे, भैय्या गव्हाणे, सरलाबाई गव्हाणे, रत्नदीप गव्हाणे, सुशिलाबई गव्हाणे, चिंतामण गव्हाणे, कल्पणाबई गव्हाणे, दिपाली गव्हाणे हे हातात काठ्या व दगड घेवून शिवीगाळ करू लागल्याने फिर्यादीच्या मुलाने विचारणा केली असता त्यांनी लाठ्या काठ्यांनी फिर्यादीसह, तिची बहीण लीलाबाई, मुलगा राहुल व पतीला काठी व दगडांनी मारहाण केली. यावेळी गावातील लोकांनी यातून त्यांची सोडवणूक केली. मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन काल रात्री फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पो. ना. भरत गायकवाड करीत आहे.







