
अमळनेर:- तालुक्यातील बोदर्डे येथील १९ वर्षीय तरुणाने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
दिनांक २४ रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या पूर्वी रुपेश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय १९) याने घरातील लाकडी सऱ्यास सुताच्या दोरीने गळफास लावून घेतला. गावातील लोकांना समजताच त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जयवंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. भटूसिंग तोमर हे करीत आहेत.




