
अमळनेर:- जि प उच्च प्राथ शाळा पळासदळे येथे ढेकू खु!केंद्राची शिक्षण परिषद व कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी नव्याने रुजू झालेल्या गटशिक्षणाधिकारी शर्मीला चव्हाण मॅडम व आर डी महाजन शिक्षण विस्तार अधिकारी यांचे स्वागत व सत्कार ढेकू खु. केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप प्रतापराव सोनवणे यांनी केला. अध्यक्ष व सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अमळनेर पदी निवड झालेले संदीप मुरलीधर वाघ, अध्यक्ष व सरचिटणीस श्रीनिवास साहेबराव सोनवणे यांचे अभिनंदन श्रीमती चव्हाण व आर डी महाजन यांनी केले. प्रास्ताविक श्री राजेंद्र आत्माराम सोनवणे यांनी केले. स्वागत गीत पळासदळे शाळेतील विद्यार्थीनी सादर केले. या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान ताईसो श्रीमती चव्हाण यांनी भूषविले. कार्यशाळेस प्रमोद पुनवटकर सर विषयतज्ञ यांनी १०० दिवस वाचन अभियान उपक्रमाबाबत सखोल माहिती दिली. तसेच पंकज काटे सर विषयतज्ञ यांनी दिव्यांग विद्यार्थी बाबत माहिती दिली. या कार्यशाळेचा मुख्य विषय अध्ययन स्तर निश्चिती बाबत मुख्याध्यापक पिंपळे भगवान पाटील यांनी सखोल अशी माहिती देवून सर्व प्रश्नांचे निरासरण केले तसेच गोपनीय अहवाल व मत्ता दायित्व फार्म कसा भरावा या संबधीत बिलखेडे शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघ यांनी सविस्तर माहीती दिली. श्रीमती सुनिता पाटील यांनी व्ही स्कूल बाबत मार्गदर्शन केले तसेच आर डी महाजन यांनी विद्यार्थी आधार अपडेट व सरल प्रणाली व इनकम टॅक्स बाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती चव्हाण गटशिक्षणाधिकारी यांनी विदयार्थी ऑफलाईन व ऑनलाईन अध्यापनाबाबत सविस्तर चर्चा केली. अशोक ठाकुर सर पळासदळे यांनी आपल्या सुमधूर देशभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता करुन अध्यक्षाच्या परवानगीने कार्यशाळा संपन्न झाल्याची परवानगी घेतली. या कार्यशाळेस श्रीनिवास सोनवणे, अशोक ठाकुर, प्रदीप चव्हाण, राजेंद्र सोनवणे यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले. आभार प्रदर्शन धिरज सुकलाल पाटील मुख्याध्यापक, ढेकू बु तांडा यांनी केले. याप्रकारे मोठ्या उत्साहात ढेकू खु. केंद्राची कार्यशाळा व शिक्षण परिषद संपन्न झाली.







