प्रवाशांच्या सोयीसाठी सात कोटी खर्चून केला बोगदा मात्र प्रवाशांचे होताय हाल…
अमळनेर:- तालुक्यातील कुऱ्हे गावाजवळ असलेल्या रेल्वे रुळाखालील अंडरपास बोगद्यात पहिल्या पावसातच दोनदा पाणी साचल्याने प्रवाश्यांचे हाल झाले.
सुमारे सात कोटी खर्च करून वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी कुऱ्हे गावाजवळ अंडरपास बोगदा बांधण्यात आला आहे. मात्र या बोगद्यातून साचलेले पाणी बाहेर निघण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याने बोगद्यात पाणी साचते. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रेल्वे गेट बंद केल्यानंतरही वाहतूक खोळंबते. पाणी साचून राहिल्याने वाहने खराब होतात. त्याच प्रमाणे रेल्वे प्रशासनाने बोगद्यात पाणी साचू नये म्हणून वरती पत्र्याचे शेड टाकलेले नाही. ज्या चेंबरमधून पाणी बाहेर जायला पाहिजे त्या चेंबर मध्येच गाळ साचून राहत असल्याने पाणी निघत नाही. प्रशासन दरवेळी उशिराने कामगार पाठवते आणि नंतर पाणी काढण्यात येते.
प्रतिक्रिया…
पाणी काढण्यासाठी दुसरीकडे जाळीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बोगद्यावर पत्र्याचे शेड लावण्यात यावे आणि तातडीने बोगदा खाली व्हावा अशी कायमस्वरूपी सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– स्मिता वाघ, खासदार जळगाव