अमळनेर:- शहरातील साने नगर भागात दि. 26 फेब्रुवारी रोजी मा.आ. स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिपक रमेश पवार, शहराध्यक्ष भा.ज.पा. शेतकरी आघाडी व मिञपरिवाराच्या कार्यकर्त्यांनी श्रम घेतले. या अभियानास स्वतः स्मिताताई वाघ व भा.ज.पा. पदाधिकारी यांनी उपस्थिती दिली. नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेत ३५४ जणांनी ई-श्रम कार्डची नोंदणी करवून घेतली. तरी या कार्डचे प्रिंट माजी आमदार स्मिताताई वाघ या स्वखर्चाने करून त्यांचे हस्ते वाटप करण्यात येणार आहे.या अभियानास मेहनत घेणारे सर्व भा.ज.पा. पदाधिकारी व मिञ मंडळ कार्यकर्त्यांचे परिसरातुन नागरिकांनी आभार व्यक्त केले.