मुलालाही केली मारहाण, पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे सांडपाण्याच्या वादातून वाद झाल्याने महिलेसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मुलाला मारहाण केल्याची फिर्याद मारवड पोलिसांत देण्यात आली आहे.
याबाबत ४४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार १५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे रंजनाबाई बडगुजर ह्या भांडे धुत असताना त्याचे सांडपाणी सदर महिलेच्या अंगणातून जात असल्याने तर माती कोरून सांडपाणी काढून दे असे महिलेने सांगितले. मात्र त्यातून वाद होवून रंजनाबाई नामदेव बडगुजर व नामदेव पोपट बडगुजर यांनी सदर महिला, तिची मुलगी आणि मुलाला शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच संदीप उर्फ बबलू नामदेव बडगुजर याने सदर मुलीचे टीशर्ट फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी महिलेस मारहाण करून अंगावर ओढल्याची फिर्याद सदर महिलेने दिली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.