अमळनेर:- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तज्ञ शिक्षण विभागाच्या दि. 30 जून 2021 शासनपत्र आदेशानुसार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन फी व जिम खाना, क्रीडा निधी संगणक शुल्क, वैद्यकीय मदत,ग्रंथालयीन निधी, प्रयोगशाळा,युथ फेस्टिवल व वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करावे, तसेच अशा विविध शुल्कात सवलत देण्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे 5 मार्च रोजी प्रताप महाविद्यालयात प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य महोदयांशी चर्चा केली. व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या काही समस्याविषयी संघटनेचे पदाधिकारी हे आमदार पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सनी गायकवाड यांनी बोलतांना सांगितले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सनी गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष मयूर पाटील, शहर संघटक दुर्गेश साळुंखे, उपाध्यक्ष कृष्णा बोरसे, शाखाप्रमुख राहुल बिऱ्हाडे, घनशाम पाटील,आकाश सेंदाणे, आदेश पाटील व महाविद्यालयातील विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.