अमळनेर:- लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे नागपूर येथील दीक्षाभूमीपासून ही यात्रा दिनांक 28 जुलै रोजी निघणार असून मंत्रालय मुंबई येथे 8 ऑगस्ट रोजी पोहचणार आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष नागराज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे पत्रकार संवाद यात्रा या कार्यक्रमाचे पोस्टरचे प्रकाशन दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, काँग्रेसचे नेते अनिल शिंदे, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, अमळनेर पोलीस ठाण्याचे गणेश पाटील, सिद्धांत शिसोदे, काँग्रेसचे नेते व सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे, काँग्रेसचे भागवत पाटील, राष्ट्रवादीचे बाळू पाटील, नागावचे माजी सरपंच महेश पाटील, ऍड तिलोत्तमा पाटील, ऍड. शकील काझी, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे, उपाध्यक्ष प्रवीण बैसाणे, नूर खान, संघटक आत्माराम अहिरे, खजिनदार हितेंद्र बडगुजर, सहसचिव योगेश पाने, प्रसिद्धी प्रमुख गणेश चौहान, यदुविर पाटील, दाजीबा गव्हाणे, सत्तार खान, राजेंद्र रढे, किशोर वाणी, सोपान भवरे, राहुल भदाणे, रिझवान मण्यार, रवी अंदानी, आदी उपस्थित होते.