
युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…
अमळनेर:- युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाइन खुली वक्तृत्व स्पर्धा स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर घेण्यात आली होती.त्यात अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविदयालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी अश्विनी माळी (जाधव) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बक्षीस वितरण कार्यक्रम दरम्यान तिचा रोख २५०० रुपये, ट्रॉफी व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर द्वितीय क्रमांक शुभम बोरसे, चाळीसगाव रोख 1500 रुपये,ट्रॉफी,सन्मान पत्र, तृतीय क्रमांक विशाखा निकम अमळनेर रोख 1000 रूपये ट्रॉफी ,सन्मानपत्र देण्यात आले.
नुकताच अमळनेर येथील जी. एस. हायस्कुल मधील आय. एम.ए. हॉल मध्ये बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल भाईदास पाटील होते,तर माजी प्राचार्य तथा शास्त्रज्ञ डॉ. ए. एल. पाटील,प्रा अशोक पवार, प्रा.गौतम मोरे, प्रा.लीलाधर पाटील आदीच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी अश्विनी माळी(जाधव) हिला वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी प्राचार्य पी.एस. पाटील, प्रा. डॉ. बी. डी. खंडागळे, प्रा. डॉ.जे. एस. सोनवणे.प्रा. डी.आर.ढगे, प्रा. अनिता खेडकर,प्रा. वी.बी. वाघमारे सर तसेच जनसहयोग संस्था अध्यक्ष राजेश ईशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेचे आयोजन युवा कल्याण प्रतिष्ठाणचे प्रा. अशोक पवार, समन्वयक गौतम मोरे, यतीन पवार यांनी तर समीक्षण प्रा. लीलाधर पाटील यांनी केले.




