प्रत्यक्ष नदीपात्रात काँक्रीट कामाचा आमदारांनी केला शुभारंभ…
अमळनेर:- तालुक्यालाच नाही तर सहा तालुक्याना संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे धरणाचे मुख्य प्रस्तंभांचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. तापी पाटबंधारे महामंडळातील महत्वकांक्षी असलेल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या नदी पात्रातील काँक्रीट कामाचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून १५५ मीटर पर्यंत प्रस्तंभ बांधकाम होणार आहे. आमदार अनिल पाटील यांनी धरण प्रेमींसाठी चलो पाडळसरेचा नारा दिला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते.
सुमारे ४३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या पाडळसरे धरणाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. शेकडो ग्रामस्थांनी आज धरणावर गर्दी केली होती. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ बी एस पाटील , माजी आमदार कैलास पाटील, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन घनश्याम अग्रवाल, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील , माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , विनोद पाटील ,चोपड्याचे घनश्याम पाटील , जि प सदस्या जयश्री पाटील , जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुलोचना वाघ , अधीक्षक अभियंता वाय के भदाणे ,कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी , रिता बाविस्कर, यांसह मान्यवर हजर होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी म्हणाले की दरवर्षी २५० टी एम सी पाणी वाहून जाते ही दुर्दैवी गोष्ट आहे. महाराष्ट्र पैशाने श्रीमंत असला तरी पाण्याने मात्र गरीब आहे. पाणी असेल तर रोटी, कपडा, मकान मिळेल उपलब्ध पाण्यात उपसा सिंचन योजना चालवून त्याचा शेतीसाठी उपयोग करा असे आवाहन केले.
आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणातून प्रकल्पात विनाकारण निर्माण केलेले गमतीशीर अडथळे सांगितले. दोन वर्षांपासून सतत मंत्रालय व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून नदी पात्रातील प्रस्तभाचे संकल्पचित्र, आयआयटी पवई कडून तयार करून मंजूरी मिळवल्याने आज कामाला सुरुवात होत आहे. मात्र त्यामुळे मिळालेल्या १३५ कोटी पैकी फक्त २५ टक्के रक्कम खर्च झाली आहे. ही रक्कम पुढील टप्प्यात खर्च करण्याची परवानगी मिळवून आगामी अधिवेशनात १२५ ते १५० कोटी निधी आणण्याचा प्रयत्न आहे. राज्य शासन २५ हजार कोटी कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. त्यात १३८५ कोटी पाडळसरेला मिळतील. तसेच केंद्रशासनाकडे देखील निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. माजी आमदार डॉ बी एस पाटील म्हणाले की धरण करणे सोपी गोष्ट नाही अनेक वर्षे त्यात जातात. जनतेचा फायदा खूप उशिरा होतो मात्र राजकारण्यांचा अधिक फायदा होतो. धरणावर अनेकांनी राजकारण केले असेही त्यांनी उदाहरण देत सांगितले. प्रास्ताविक करताना तांत्रिक सल्लागार पी आर पाटील यांनी धरणाची सर्व माहिती सांगून आता काय कामे होतील ते सांगितले.
नदी पात्रातील प्रस्तंभ नव्या डिझाईन ने बांधण्यासाठी आधीचे स्तंभ ६० सेमीने विशेष कटर मशीन ने मुर्धा पातळीपर्यंत कमी करण्यात येणार असून त्यात बोअर करून ३२ मिमी चे तीन तीन लोखंडी बार चा संच रासायनिक ग्राऊट सोल्युशन ने पक्के करण्यात येईल मग १४९ मीटर पर्यंत बांधकाम केले जाईल. सोबत गेटचेही काम सुरू होईल टुनियन बॉक्स लावले जातील. १५५ मीटर पर्यंत उंचीला मान्यता मिळाली आहे. जुन्या सळया गंजलेल्या असल्याने सॅन्ड ब्लास्टिंग करून गंज काढला जाईल. जुने बारची चाचणी करून एम २० ऐवजी एम ३५ चे उच्च प्रतीचे काँक्रीट करून गेटचा पाया भक्कम केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील, धरणसंघर्ष समिती अध्यक्ष सुभाष आण्णा चौधरी, धरण समिती उपाध्यक्ष शिवाजी पाटील, कामगार नेते एल.टी. पाटील, नगरसेवक श्याम पाटील, नगरसेवक मनोज दाजीबा पाटील, नगरसेवक अभिषेक पाटील, नगरसेवक मेजर अण्णा पाटील, नगरसेवक संतोष अण्णा पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नगरसेवक ऍड यज्ञेश्वर पाटील, उद्योजक विनोद भैय्या पाटील, नगरसेवक सुरेश आत्माराम पाटील, नगरसेवक रामकृष्ण पाटील, नगरसेवक विवेक पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, शिवाजी नाना पाटील, राजू फापोरेकर, पवार सर, कल्पना दिनेश पाटील, आशा चावरिया, कविता पवार, रंजना देशमुख, योजना पाटील, माधुरी पाटील, अनिल शिसोदे, पिंटू राजपूत, पंचायत समिती उपसभापती पारोळा जितेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, पंचायत समिती सभापती श्याम बाप्पू अहिरे, सुरेश पिरण पाटील, प्रवीण जैन, डॉ. किरण पाटील, माजी नगरसेवक भाईदास महाजन, प्रा अशोक पवार सर, बी के सूर्यवंशी, उमाकांत भाऊसाहेब, माजी पंचायत समिती सदस्य संदेश पाटील, सरपंच पाडळसरे सचिन पाटील, सरपंच पातोंडा भरत देवाजी बिरारी, उपसरपंच नितीन मंगल पारधी, सरपंच पिंपळे दिनेश पाटील, सरपंच निंभोरा सुनील पाटील सर, सरपंच शहापूर डॉ.भानुदास पाटील, सरपंच मुंगसे प्रकाश कोळी, सरपंच करणखेडा महेश पाटील, उपसरपंच मारवड बी डी पाटील सर, सरपंच नगाव बु महेश पाटील, सरपंच भरवस अशोक पाटील, सरपंच जळोद मुन्ना साळुंखे, सरपंच गांधली भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील एकतास, सरपंच हिंगोणे बु केदारसिंग जाधव, गिरीश सोनजी पाटील, कल्पिता पाटील लोणसीम, विश्वास पाटील, अनिल बोरसे, राकेश मुंदडा, रावसाहेब पाटील, संजय भदाने, भुपेंद्र कदम, सुधाकर धनगर, नरेंद्र बाळू पाटील, हेमंत पवार, अशोक पाटील, दिनेश कोठारी, देविदास देसले , हिरामण कंखरे,महेश पाटील , सुनिल भोई, योगेश पाटील, रविंद्र पाटील, पुरुषोत्तम शेठे, गिरीष पाटील, माजी शहराध्यक्ष बाळू पाटील, सडावण अनिल साहेबराव पाटील, बाळासाहेब विंचुरकर, शामकांत पाटील, जवखेडा यशवंत बैसाणे, सुनिल पवार, मगन भाऊसाहेब निम, रावसाहेब पाटील, संजूबाबा पाटील, कैलास पाटील, शहापूर मिठाराम तात्या, डी जी पाटील, भिकन सहादेवपुरे, पप्पू विलास पाटील, राहुल पवार, सुनील शिंपी, प्रवीण चौधरी, मुन्ना चौधरी, हिलाल तात्या, प्रवीण लाड, जितेंद्र पवार, अनंता निकम, जाकीर शेख, प्रदीप पाटील, सनी गायकवाड, भूषण भदाणे, गौरव पाटील, मुन्ना पवार, मनोज बोरसे, मनोहर पाटील, पप्पू कलोसे, डॉ.संजय पवार, विनोद परदेशी सर, भैय्या पाटील, पंकज पाटील, जयवंत पाटील, बाळासाहेब शिसोदे, डॉ.रामराव पाटील, प्रशांत भदाणे, शत्रुघन शत्रुग्घ पाटील, बापू झुलाल पाटील, मधुकर पाटील, ऍड.चंदू पाटील, दादाभाऊ पाटील, रफिक शेख, नंदू पाटील, संभाजी पाटील, मुशीद शेख, नितीन भदाणे, सुनील पाटील, मोहन पाटील, आत्माराम पाटील, नामदेव अभिमान, रंजीत नाना, अशोक पाटील, लोंढवे प्रताप पाटील, महारु अण्णा, भैय्यासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, मयूर पाटील, जाकीर शेख, उमेश सोनार, गोविंद बाविस्कर, पंकज पाटील, ज्ञानेश्वर देसले, राहुल गोत्राळ, राज पाटील, दादू पाटील, संजीव पाटकरी, गणेश पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, गौरव महाजन, गजू महाजन, देविदास देसले, रवींद्र कौतिक पाटील, भारकर दादा हिंगोने बु., संजय महाजन, जुनेद शेख, निळकंठ तात्या, बापू पाटील, रॉबीन पोलीस, शिंदे सर, फिरोज मिस्तरी, पप्पू चावरीया, बंडू जैन, गौरव महाजन, हाबिब मिस्तरी आरिफ मेवाती, सोनू पाटील, गजू भाऊ पाटील, नारू पाटील, नंदू महाराज, उदय पाटील, गणेश पवार सर धार, नगरसेवक दीपक पाटील, प्रदीप पाटील वावडे, योजना ताई पाटील, जयवंत पाटील, संभाजी पाटील, रणजित शिंदे, विवेक पाटील नगरसेवक, अनिरुध्द शिसोदे,गौरव पाटील, निनाद शिसोदे, सनी गायकवाड, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, एस.एम. पाटील, नामदेव पाटील, महेश पाटील, चेतन पाटील, सुनिल पवार, अलीम मुजावर धार, यशवंत पाटील धार, प्रमोद पाटील धार, शिरूड सरपंच गणेश सोनवणे, निलेश देशमुख शहराध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष कृष्णा रामदास पाटील, अजय राजेंद्र कढरे, मोहन बापू झाडी, आसाराम पाटील, रज्जब खान (सरपंच) सारबेटे बू, हारून मेवाती (ग्रा. प. सदस्य सारबेटे बू ), मनू कोठारी, विजय जैन, हेमंत पवार, गौतम पाटील, वरून पाटील, चेतन बहारे, नाना पाटील, राजू देशमुख, जयंत पाटील, गणेश पाटील, गुणवंत पाटिल, सर्जेराव पाटील, रफीक मिस्त्री, मुशीर शेख, भाऊसाहेब मिस्त्री, भैया वाघ, शहापूर कैलास पाटील, निलेश पाटील, विकास पाटील, सचिन पाटील, शांताराम पाटील, संजय पाटील पहेलवान, शुभम पाटील, आरिफ पठान, वसीम पठान, कल्पेश साळुंखे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत पाटील यांनी केले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.