आमदार अनिल पाटलांनी कृषी मंत्र्यांकडे केली मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील शेतकऱ्यांना बनावट बियाणे देऊन त्यांची फसवणूक केल्याने हा विषय आमदार अनिल पाटील यांनी गांभीर्याने घेत मुंबई येथे कृषी मंत्र्यांची भेट घेऊन सदर बनावट बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला भाग पाडा अशी मागणी केली आहे.
याबाबत आमदारांनी कृषीमंत्री ना दादाजी भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर मतदार संघातील डांगर बु व जानवे येथील शेतकयांनी शक्ती 2 PKT, व ७८७२२PKT व टाटा ७८७२ २ PKT या बाजरी बियाण्यांची खरेदी करून एकूण 200 एकर क्षेत्रावर बाजरी पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली असून तीन महिने झाले तरी बाजरी पिकाच्या कणसांना दाणे लागलेली नाहीत. सदर कंपनीच्या प्रतिनिधीनी पाहणी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. तरी संबंधित बाजरी बियाण्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपल्या स्तरावरुन आदेश निर्गमित करण्यात यावे अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.