अमळनेर : विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रात जास्तीचे मतदार झाल्याने नवीन पाच मतदान केंद्र वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेर विधानसभा मतदार संघात ३२० मतदान केंद्रे होती मात्र काही मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अधिक झाल्याने पाच केंद्राचे विभाजन करून नवीन मतदान केंद्रे करण्यात येणार आहेत. अमळनेर शहरातील सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात असलेल्या १७४ क्रमांकाच्या मतदान केंद्रातील ६६५ ते १३८६ मतदारांचा १७५ मतदान केंद्रात समावेश करण्यात येणार आहे. पैलाड भागातील १९७ मतदान केंद्रातील ७२३ मतदार नव्याने समाज मंदिर पैलड येथील १९८ मतदान केंद्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. सारबेटे बुद्रुक येथील नवीन वाढीव ११८ मतदार तसेच मतदार क्रमांक ७२१ ते १३६६ हे देखील नवीन मतदान केंद्र २४७ मध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथील मतदान केंद्र ३०८ मधील मतदार क्रमांक ७२० ते १४५३ हे मतदान केंद्र क्रमांक ३०९ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तर हिरापूर येथील ३१३ क्रमांकाच्या मतदान केंद्रातील मतदार क्रमांक ७५१ ते १४५१ मधील मतदार ३१४ क्रमांकाच्या मतदान केंद्रात समाविष्ट करण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे पाठवला आहे