अमळनेर-आषाढी निमित्त येथील एस टी आगाराला विठोबा पावले असून पंढरपूर यात्रोत्सवामुळे आगारास 18 लक्ष,82 हजार 860 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याबाबत आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.दरवर्षी पंढरपूर यात्रेला जाणाऱ्यांची संख्या अमळनेर परिसरातून खूपच असल्याने सदर यात्रोत्सवासाठी 31 बसची व्यवस्था केली होती यातील प्रत्येकी 6 बस नगर व जालना आगाराला देण्यात आल्या होत्या त्याचेही उत्पन्न अमळनेर आगराला मिळाले.तर अमळनेर येथून 102 फेऱ्या होऊन सुमारे 24 हजार 196 किमी बस धावली यामुळे आगाराला 18 लाख,82 हजार 860 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री चौधरी यांनी दिली.आगारात सद्यस्थितीत 69 बसेस अमळनेर आगारात सद्यस्थितीत बस संख्या 69 असून लॉक डाऊन च्या आधी हीच संख्या 95 ते 96 पर्यंत होती,परंतु 20 ते 25 बसेस कमी झाल्याने फेऱ्या करण्यात अडचण निर्माण होते परिणामी काही गावांना मागणी असूनही बस देण्यास आम्ही असमर्थ ठरत असल्याचे प्रमोद चौधरी यांनी सांगितले.सदर स्थिती लक्षात घेता अमळनेर आगाराला अजून किमान 15 ते 20 नवीन बसेस मिळण्याची नितांत गरज असल्याचे दिसत आहे.नवीन डेपोसाठी 8 कोटी मंजूर येथील एस टी डेपो ची सद्यस्थितीत दुरावस्था झाली असून डेपो परिसरात प्रचंड चिखल माखत असतो मात्र मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी नवीन डेपो साठी 8 कोटी निधीस मंजुरी मिळाली असून यातून डेपो ची नवीन इमारत तसेच संपूर्ण परिसरात काँक्रीटीकरण,नवीन वॉशिंग सेंटर निर्माण केले जाणार आहे.यामुळे अमळनेर डेपो ला नवीन रूप प्राप्त होणार आहे.लवकरच हे काम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.