
अमळनेर:- तालुक्यातील भरवस रस्त्यावर दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात एका दुचाकीस्वाराला धक्का लागून फेकला गेल्याने जखमी झाला आहे. सदर दुचाकीस्वाराने दोन्ही भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तक्रार दिली आहे.
फिर्यादी विलास शांताराम पाटील रा. नांदगाव हे २४ फेब्रुवारी रोजी आपल्या दुचाकीवर बहिणीला भेटायला भरवस येथे जात असताना सकाळी १०:३० वाजता लोण फाटा ते भरवस गावा दरम्यान समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडी क्र एम पी ६८ सी ३२०५ हिने बाजूला जाणाऱ्या एको गाडी क्र. एम एच १८ बीसी २०५० ह्या वाहनाला धडक दिल्याने इको गाडीचा धक्का लागून दुचाकीस्वार विलास हे फेकले गेल्याने जबर जखमी झाले. त्यांच्या तोंडाला, नाकाला कपाळाला टाके पडले असून हात फ्रॅक्चर झाल्याने धुळे येथे उपचार सुरू होते. त्यामुळे फिर्याद दाखल करण्यात उशीर झाला. या दोन्ही चारचाकी वाहनांच्या चालकांविरुद्ध त्यांनी मारवड पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास ए एस आय राजेंद्र पाटील हे करीत आहेत.







