
अमळनेर तालुका कृषि विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर:- येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्मनिर्भर भारत अभियान योजना अंतर्गत तालुका स्तरीय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेबाबत कार्यशाळा घेण्यात आली.
“प्रधानमंत्री सुश्म खाद्य अन्न प्रक्रिया” योजना व प्रेरणा दायी आदरणीय पद्मश्री भुषण रायाबई फोफरे यांच्या कार्याचा आलेख गाथा सांगुन महिलांना महिला दिनी प्रेरणा दिली. दीपक साळुंखे मंडळ कृषि अधिकारी यांनी उद्योग योजना बद्दल कोण व किती गट लाभार्थी होऊ शकता ही सविस्तर माहिती सांगितली. महिलांना,महिला बचत गट प्रतिनिधी प्रमुख तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या राज्य अध्यक्षा प्रा.सौ.रंजना प्रविण देशमुख ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून होत्या. देशमुख यांनी प्रथम बचत गटाविषयी महिती दिली. गट कोणी स्थापन करावे, गटाची संघटनात्मक बांधणी, बचत गटाची उदिष्ट, बचत गटाची पहिली मीटिंग त्याचे प्रोसिडिंग कसे तयार करावे. बचत गटाचे रजिस्ट्रेशन करायची गरज पडली तर ते कसे करावे याबद्दल चर्चा केली. तसेच बचत गटाच्या महिलांना मिळणारे एक लाखापासून दहा लाखापर्यंत कर्ज शासन दरबारी कोणते कोणते व कसे कसे उपलब्ध होऊ शकते याबद्दल चर्चा व सविस्तर माहिती देण्यात आली. महिला उद्यम निधी योजना ही दहा लाखापर्यंत असून ह्या योजने अंतर्गत सलून, पार्लर, दुकान, रेस्टॉरंट, प्रायव्हेट क्लासेस, रोपवाटिका, पापड व्यवसाय साठी दहा लाखा पर्यंत महिलांसाठी अर्थ सहाय्य दिले जाते. ह्या योजनेबाबत सविस्तर माहिती प्राध्यापक रंजना देशमुख यांनी सांगितली. ह्या कार्यशाळेत शिक्षिका प्रा. रंजना देशमुख यांनी मी तालुक्यातील सर्व बचत गटातील महिलांना बचत गट मेळावे घेवुन मार्गदर्शन करेन व ह्या योजनेचे जास्तीत जास्त गट लाभार्थी करून महीला सबलीकरण तालुक्याचा विकास बळीराजाचा प्रश्नास थोडासा हातभार लाऊ असे ठाम मत मांडले.मंडळ कृषी अधिकारी साळुंखे यांनी PMFME, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, महाडी बी टी व इतर योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ कृषी अधिकारी दीपक साळुंखे, प्रदीप निकम, मयूर कचरे,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, निंभोरा येथील सरपंच सौ.पायल पाटील,तसेच तालुक्यातील महिला बचत गट अध्यक्षा प्रतिनिधी व इतर शेतकरी उपस्थित होते. योगिता लांडगे कृषि सहायक यांनी सूत्रसंचालन केले.







