
तालुक्यातील शिरसाळे येथील घटना…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील ३२ वर्षीय तरुणाने लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी दगडू लाला पाटील यांनी मारवड पोलिसात दिलेल्या फिर्यादनुसार दि. ९ मार्च रोजी गावात कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने सर्व जण त्या ठिकाणी हजर होते. त्यांचा पुतण्या रमेश बुधा पाटील वय ३२ हा घरीच होता. त्याचे लग्न जमत नव्हते व त्यास दारू पिण्याचे व्यसन लागले होते. दि. १० रोजी सकाळी पाच वाजता तरुणाची आईने फिर्यादीला उठवून सांगितले की रमेश याने गळफास घेतला आहे. त्याठिकाणी जावून पाहिले असता रमेश याने घरातील खुटीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. इतरांच्या सहाय्याने त्यास उतरवून खाजगी गाडीत टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. भरत गायकवाड हे करीत आहेत.







