
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथून घरासमोरून ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी अभिजित पांडुरंग महिरराव रा. बेटावद हल्ली मुक्काम पाडसे यांची मोटारसायकल हिरो होंडा कंपनीची ट्रिगर मोटारसायकल क्रमांक एम एच १८ ए आर ४५५५ ही गाडी २८ ते २९ फेब्रुवारी रात्रीच्या दरम्यान घरासमोरून लंपास केली. फिर्यादीची तब्येत खराब असल्याने फिर्याद देण्यात उशीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून मारवड पोलीसात भादवि कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सचिन निकम हे करीत आहेत.




